जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२१ । शहरातील शिवाजीनगरातील एका महिलेने मोरया रुग्णालयात तिळ्यांना जन्म दिला. या महिलेची मंगळवारी सामान्य प्रसूती होऊन बाळांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टर जितेंद्र मोरे-कोळी यांनी सांगितले.
शिवाजी नगरातील रेणुका चव्हाण यांना मोरया रुग्णालयात दाखल केले होते. महिलेचा रक्तदाब वाढलेला होता. शिवाय त्यांच्या पेशीही कमी झालेल्या होत्या. डॉ.जितेंद्र कोळी यांनी योग्य पध्दतीने सर्व परिस्थिती हाताळली. महिलेने तिळ्यांना जन्म दिला असून, माता व बाळ सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.