गुन्हेयावल

पुरावा म्हणून चोरट्यांनी लिहिला हिशोब ; दुकान मालक आणि पोलिसांना लावले कामाला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । (सुरेश पाटील) । यावल पोलीस स्टेशन पासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी संकुलनात असलेल्या श्री हरी कृपा बुक डेपो अंड प्रोव्हिजन स्टोअर्स दुकानात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आलीय. यात चोरट्यांनी ६४०० रुपयाची रोकड लंपास केलीय.

याबाबत असे की, मध्यरात्री कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी संकुलनात असलेल्या श्री हरी कृपा बुक डेपो अंड प्रोव्हिजन स्टोअर्स दुकानाचे लोखंडी रॉडच्या साहाय्यानेशटर व लोखंडी चॅनेलगेट तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.

यात चोरट्यांनी दुकानातील सामानाची शोधाशोध करून गल्यात असलेले रोख ६ हजार ४०० रुपयाची रोकड़ मोजून एका कागदावर बेरीज लिहून ठेवून रक्कम घेऊन फरार झाले आहेत.

याबाबत यावल शहरात व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस स्टेशनपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या भुसावळ टी पॉइंट जवळ अज्ञात चोरटे भुसावळकडून किंवा रावेरकडून वा चोपड्याकडून आले होते किंवा कसे किंवा अज्ञात चोरटे यावल शहरातीलच आहेत का? याबाबतची चौकशी करणे यावल पोलिसांना एक मोठे आव्हान ठरले आहे.

यावल पोलिसांची रात्रीची गस्त आहे किंवा नाही. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून चोरीच्या घटनेबाबत दुकान मालक आणि पोलीस पुढील कार्यवाही काय करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button