⁠ 
शुक्रवार, मे 10, 2024

हॉटेलमध्ये स्वीकारली लाच, धरणगाव विस्तार अधिकाऱ्यासह ग्रामसेवक जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । कंडारी बुद्रुक येथे शिपाई म्हणून नोकरीस असलेल्या एका कर्मचाऱ्याला २०१५-१६ या वित्तीय वर्षात दिले गेलेल्या जादा वेतनाची परतफेड करण्यासंदर्भात त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. नोटिशीचा अनुकूल अहवाल देण्यासाठी दोन हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धरणगाव विस्तार अधिकाऱ्यासह कंडारी बुद्रुकच्या ग्रामसेवकाला अटक केली आहे.

कंडारी बुद्रुक येथे शिपाई म्हणुन नोकरीस असलेल्या तक्रारदाराला सन-२०१५-१६ या वित्तीय वर्षात जादा वेतन दिले गेले होते. सदर जादा देण्यात आलेली रक्कमेची परतफेड करणेबाबत तक्रारदार यांना नोटीस आल्याने त्या नोटीसचा अनुकूल अहवाल जिल्हा परीषद, जळगाव येथे पाठविण्याच्या मोबदल्यात त्यांना दि.२८ रोजी लाच मागण्यात आली होती.

हॉटेलमध्ये स्वीकारली लाच
धरणगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुरेश शालिग्राम कठाळे (वय-५१) व कंडारी बुद्रूकचे ग्रामसेवक कृष्णकांत राजाराम सपकाळे यांनी प्रत्येकी १ हजारांची पंचासमक्ष लाच मागितली होती. सोमवारी ग्रामसेवक कृष्णकांत सपकाळे यांनी हॉटेल मानसी, चोपडा येथे पंचासमक्ष १ हजारांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.

पथकात यांचा होता समावेश
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सफौ.दिनेशसिंग पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, मपोहेकॉ.शैला धनगर,पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकाॅ.महेश सोमवंशी, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ यांनी ही कारवाई केली.