जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर ओला आणि कोरडा असे दोन्ही प्रकारचे दुष्काळ पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले आहेत. मात्र शासनातर्फे शेतकऱ्यांना कोणतीही मदत न मिळाल्याने ते हवालदिल झाले आहेत. लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी जिल्ह्यातील भाजप लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली.
जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरु आहे. जिल्ह्यातील विविध विषयांवर बैठकीत चर्चा सुरु असून भाजपच्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या विषयावर मुद्दे मांडले.
यावेळी अमळनेरचे आमदार भाईदास पाटील म्हणाले की, फेब्रुवारीमध्ये पडलेल्या दुष्काळाबाबत अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना एक कोटी रुपयांची मदत मिळाली आहे व ती आजपासून त्यांना द्यायला सुरुवात झाली अशी माहिती त्यांनी दिली.