⁠ 
रविवार, मे 19, 2024

गणेशोत्सवासाठी नागपूर-कोकणदरम्यान विशेष गाड्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२१ ।  गणेशोत्सवासाठी भाविकांची सोय व्हावी म्हणून मध्य रेल्वेने नागपूर येथून कोकणाला जोडण्यासाठी दोन विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. नागपूर ते करमळी दरम्यान ही सेवा असेल. त्याचा भुसावळ विभागातील प्रवाशांना देखील फायदा होईल.

गणपती स्पेशल नागपूर-करमळी विशेष गाडी ०१२५५ नागपूर येथून ४ व ११ सप्टेंबरला दुपारी ३.५० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी २.१५ वाजता करमळी येथे पोहोचेल.

०१२५६ विशेष करमळी येथून ५ व १२ सप्टेंबरला रात्री ८.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ८.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ०१२५५ या गाडीला वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड येथे थांबे असतील. तर १२५६ या गाडीला थिवि, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा येथे थांबे असतील.

गाडीला एक द्वितीय वातानुकुलीत, चार तृतीय वातानुकुलीत, अकरा शयनयान आणि सहा द्वितीय श्रेणी आसन असे डबे असतील. अतिरिक्त विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह रविवारपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर बुकिंग सुरू होईल. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.