जळगाव शहर

कोरोनात छत्र हरवलेल्या पाल्यांना भरारी फाऊंडेशन, के.के.कॅन्सचा मायेचा आधार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | २७ ऑगस्ट २०२१ |  कोरोना काळात अनेकांचे छत्र गेले तर अनेकांचा आधार हरपला. जळगावातील भरारी फाऊंडेशन व के.के.कॅन्सने कोरोनात आई-वडील गमावलेल्या १४ बालकांना आर्थिक, शैक्षणिक व अत्यावश्यक साहित्यांची मदत करून मायेचा आधार देण्याचा लहानसा प्रयत्न केला आहे. पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

भरारी फाउंडेशन व के.के.कॅन्सकडून कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या जळगाव जिल्ह्यातील १८ वर्षा खालील १४ मुलामुलींना ७० हजारांची मद्त करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, रजनीकांत कोठारी, नंदू अडवाणी, बाळासाहेब सूर्यवंशी, डॉ.प्रीति दोशी, गृह शाखेचे उपअधीक्षक भास्कर ढेरे, महिला बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी हे उपस्थित होते.

उपक्रमासाठी दलीचंद जैन, रजनीकांत कोठारी, नंदू अडवाणी, विजय जोशी, डॉ.रूपेश पाटील, मुकेश हासवानी, चंदन तोष्णीवाल, जय दोशी, अजिंक्य देसाई, विनोद बडगुजर, दीपक परदेशी यानी सहकार्य केले.

कोरोना काळात ज्यांनी आपले आई वडील दोन्ही गमावले असे जिल्ह्यात अठरा वर्षाखालील २० मुले-मुली आहेत. ज्यांची परिस्थिति फारच हलाकीची आहे अशा १४ मुला मुलींना प्रत्येकी ५ हजारांची मदत एकूण ७० हजार रोख व शैक्षणिक साहित्य तसेच किराणाचे किट कार्यक्रमात देण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विनोद ढगे, सचिन महाजन, नीलेश झोपे,दीपक विधाते, आकाश धनगर, नीलेश जैन, दुर्गेश आंबेकर, रितेश लिमडा, विक्रांत चौधरी, चेतन वाणी, स्वप्निल वाघ यांनी परिश्रम घेतले. सूत्र संचालन विनोद ढगे यांनी केले तर प्रस्ताविक भरारी फाऊंडेशनचे दीपक परदेशी यांनी केले.

अनाथ मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारली
कोरोना काळात ज्या मुलींनी आपले आई-वडील गमावले आहेत अशा मुलींच्या लग्नाची जबाबदारी देखील के.के.कॅन्स व भरारी फाउडेशनने स्वीकारली आहे. कार्यक्रमात याबाबत माहिती देण्यात आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button