जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२१ । आज जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोने प्रति १० ग्रॅम ४५० रुपयाने स्वस्त झालं आहे. तर चांदीचा प्रति एक किलो २०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यापूर्वी काल बुधवारी सोने ३० रुपयाने तर चांदी ५६० रुपयाने महागली होती.
कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे सोने चांदीचे भाव वेगाने बदलत आहे. जळगाव सराफ बाजारात गेल्या दोन दिवसात सोने प्रति १० ग्रॅम ५१० रुपयाने तर चांदी १७९० रुपयापर्यंत वधारले आले.
जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. परंतु गेल्या दोन दिवसापासून सोने आणि चांदी दरात वाढ झाल्याचे दिसून आले. त्यानंतर आज पुन्हा सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपये प्रती १० ग्रॅम इतका वाढला होता. मात्र मागील काही महिन्यात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव गडगडला.
आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८२८ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,२८० रुपये आहे.
आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६४,७६० रुपये इतका आहे.
या अॅपद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकता
तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे आपण केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर आपण त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रार देखील करू शकता.