जळगाव जिल्हा
जवान गोपाल सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांनी केले सात्वंन
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१। ओडिशा येथे सीआयएसएफ मध्ये कार्यरत असलेले कुऱ्हाड, ता. पाचोरा येथील जवान गोपाल अरुण सुर्यवंशी यांचे नुकतेच निधन झाले. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज कुऱ्हाड येथे जावून जवान गोपाल सुर्यंवशी यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन सात्वंन केले.
यावेळी पालकमंत्र्यांनी जवान अरुण सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांना सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे यावेळी सांगितले. याप्रसंगी पालकमंत्र्यांसोबत आमदार किशोर पाटील यांचेसह ग्रामस्थ, कुटूंबिय उपस्थित होते.