जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१ । कोरोना महामारीत खाद्य तेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान, आता केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे यंदाच्या सणासुदीत खाद्यतेल स्वस्त होण्याची चिन्हे आहेत.
तेलाच्या आयातीतदेखील घट
भारताला एकूण गरजेच्या जवळपास ७० टक्के खाद्यतेल आयात करावे लागते. या ७० टक्क्यांपैकी ५५ ते ६० टक्के खाद्यतेल हे पामतेल असते. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत करोना संकटामुळे पामतेलाच्या आयातीत घट झाली होती. त्याचवेळी घरगुती क्षेत्राकडून मागणी असलेल्या सूर्यफुलाच्या तेलाच्या आयातीतदेखील घट झाली. परिणामी अन्य खाद्यतेले महाग झाली आहेत. आता मात्र त्या दरांमध्ये घट होण्याची आशा निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारने सोयाबीन व सूर्यफुलावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून साडे सात टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे आता हा खर्च ३० ते ३५ हजार कोटी रुपयांवर येणार आहे. यामुळे येत्या १५ दिवसांत खाद्यतेलाचे दर कमी होण्याची चिन्हे आहेत. आगामी काळ सणांचा असल्याने हा मोठा दिलासा मिळण्याची आशा आहे.’
खाद्यतेलाचे दर (रुपये/लिटर)
प्रकार एप्रिल सध्या शुल्क कपातीनंतरचे दर
पाम १२५-१३० १२०-१२५ ११०-११५
सोयाबीन १६०-१७५ १४५-१५५ १३०-१३५
सूर्यफूल १६५-१८५ १५०-१७० १३०-१४०
शेंगदाणा १९५-२२५ १७५-२१५ १६५-१९५
राईसब्रान १५५-१६५ १४०-१६० १३०-१४०