जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२१ । आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावात काहीसा वाढ झाल्याचे दिसून येतेय. आज जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या भाव प्रति १० ग्रॅम ३० रुपयाने महागले आहे. तर आज चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज चांदी प्रति किलो ३६० रुपयाने स्वस्त झाली आहे.
गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. मात्र, या आठवड्यात दोन्ही धातूंमध्ये पुन्हा वाढ झाली. गेल्या ५ दिवसात सोने ९७० रुपयाने महागले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात सोने दर ४८ हजाराच्या घरात होते ते आता ४९ हजाराच्या वर आले आहे.
कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे सोने चांदीचे भाव वेगाने बदलत आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सराफ व्यावसायिकांनी सोने खरेदीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या भावात वाढ होत आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपये प्रती १० ग्रॅम इतका वाढला होता. मात्र मागील काही महिन्यात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव गडगडला.
आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८२७ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,२७० रुपये आहे.
आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६३,५९० रुपये इतका आहे.