⁠ 
रविवार, मे 19, 2024

महिलांच्या नावाने घर खरेदी कराल तर मिळेल इतकी सूट; जाणून घ्या सविस्तर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या तुमच्यापैकी अनेकांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न असेल, तर तुमच्यासाठी हि अतिशय महत्त्वाची बातमी आहे. घर खरेदी करतांना महिलांच्या नावावर नोंदणी केल्यास सरकारी योजनांचा लाभ आणि करातून मोठी सवलत मिळते. तसेचइन्कम टॅक्समध्ये देखील मोठी सवलत मिळते. परंतु अनेकांना याची माहिती नसल्यामुळे ते या लाभपासून वंचित राहतात.

आपल्यापैकी अनेकजण घर खरेदी करतांना त्यासाठी गृहकर्ज घेतात. जर तुम्ही गृहकर्ज महिलेच्या नावाने घेतल्यास तुम्हाला व्याजदरमध्ये मोठी सूट मिळू शकते. महिलांना व्याजदर तुलनेने कमी असतात. यामुळे व्याजात तुमचे चांगलेच पैसे वाचू शकता.  सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी भारतीय स्टेट बँकेत (एसबीआय) महिलांना गृहकर्जावर इतरांपेक्षा ०.५ टक्के कमी व्याजदर लागतो. तसेच महिलांच्या नावाने घराची नोंदणी झाल्यास स्टॅम्प ड्युटीतही कमी भरावी लागते.

घर खरेदीत महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून राज्यस्तरावर अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान आवास योजनेत (पीएमएवाय) कमी उत्पन्न गटातील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी घरातील महिलांच्या नावावर घर खरेदी करणे बंधनकारक आहे.