जळगाव जिल्हा

शाळांच्या संरक्षण भिंतींमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढण्यास मदत – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

 

जळगाव लाईव्ह न्यूज  । १४ जुलै २०२१ ।  शाळेला संरक्षण भिंत बांधल्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षा मिळण्याबरोबरच त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी खु. च्या फुलेनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेस बांधलेल्या संरक्षण भिंतीचे लोकार्पण आज पालकमंत्री श्री. पाटील यांच्या करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी पुढे बोलताना ना. पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळांना संरक्षण भिंत बांधण्याचा उपक्रम जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत असून या उपक्रमाचे राज्य पातळीवरही अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे. शाळांना भिंती बांधल्याने विद्यार्थ्यांना संरक्षण मिळते. यामुळे विद्यार्थी एकाग्रतेने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करू शकतात. तसेच यामुळे परिसर सुशोभीत देखील दिसतो. जळगाव जिल्ह्यातील पाचशेपेक्षा जास्त शाळांना या योजनेच्या माध्यमातून संरक्षक भिंती बांधण्यात येत आल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

याच उपक्रमांतर्गत पाळधी खुर्द गावातील फुलेनगरातील जिल्हा परिषदेच्या शाळेला संरक्षण भिंत बांधण्यात आली असून आज याचे लोकार्पण होत आहेत. या भिंतीचे काम मनरेगा, जिल्हा नियोजन समिती आणि चौदावा वित्त आयोग योजनेंतर्गत केले गेले. यासाठी १० लक्ष ४७ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली होती. याप्रसंगी शाळेच्या आवारात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. केवळ वृक्ष न लावता याचे संगोपनही झाले पाहिजेत याकरीता झाडांनी निगा राखण्याची सुचनाही त्यांनी स्थानिकांना केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मुख्याध्यापक शरद पाटील यांनी केले तर आभार केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी मानले.

या कार्यक्रमाला प. स. सभापती प्रेमराज पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, राजुभैया पाटील, दिलीप पाटील, दामू अण्णा पाटील, संजय पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सोनवणे, सरपंच चंदुभाऊ माळी, प्रकाश पाटील, केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे, ग्रामविकास अधिकारी श्री. पाठक, मुख्याध्यापक शरदआबा पाटील, शाळेचे अध्यक्ष सचिन सरकटे, अरविंद मानकरी, संदीप पवार, नाना पाटील, बापू मोरेयांचेसह शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button