⁠ 
शनिवार, मे 18, 2024

वावडदा बनावट मद्यप्रकरणी आणखी एका नवीन संशयिताचे नाव समोर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२१ । वावडदा शिवारात बनावट मद्यनिर्मितीच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी रात्री धाड टाकली होती. दरम्यान, या प्रकरणी आणखी एका नवीन संशयिताचे नाव विजय (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या एका कारवाईतही त्याचे नाव पुढे आले होते, असे समोर येते आहे.

वावडदा शिवारात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल भोळे यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या जागेवर एक इमारत आहे. तेथे म्हाळसाई स्टोन क्रसिंग कंपनीजवळील खाेलीत बनावट मद्यनिर्मिती होत असल्याचे  या कारवाईत उघड झाले आहे. दरम्यान, वावडदा येथील कारवाईतील जागा मालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल भोळे यांच्या पत्नीच्या नावावर आहे. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जागा मालक अद्याप बेपत्ता आहेत. त्याबाबत तपास सुरू आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या अधिक्षक सिमा झावरे यांनी दिली.

भुसावळच्या गुन्ह्यात नवीन संशयित : राज्य उत्पादन शुल्कच्या भुसावळ विभागाने ५ ऑगस्ट रोजी मोहराळा फाट्याजवळ सापळा रचून ३ लाख १३ हजार रुपयांचे मद्यार्क जप्त केले. या प्रकरणी कुर्बान छबु तडवी (वय २८, रा. हिंगोणा, ता. यावल) या तरुणाचे नाव पुढे आले आहे. हा मद्यार्क पुढे कोणाकडे पाठवण्यात येणार होता, याची माहिती तडवी यांच्याकडे असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार तडवीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.