जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने एक खास स्कीम आणली आहे. ‘आधार शिला प्लॅन’ असे या एलआयसीच्या स्कीमचे नाव आहे. ज्याचा लाभ 8 वर्षे ते 55 वर्षे वयाच्या महिला घेऊ शकतात. या पॉलिसीत मॅच्युरिटीच्या वेळेस विमाधारकाला एक निश्चिती रक्कम दिली जाते. जर मॅच्युरिटीच्या आधीच विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली जाते. या पॉलिसीत तुम्हाला रोज फक्त २९ रुपयांची बचत करून लाखो रुपयांची रक्कम उभी करता येते.
एलआयसीची आधारशिला खास महिलांसाठी तयार केलेली पॉलिसी आहे. यूआयडीएआयने आधार कार्ड जारी केलेल्या महिलांसाठी हे धोरण तयार केले गेलेय. ही हमी परतावा देण्याची योजना आहे. यामध्ये तुम्हाला बोनस सुविधेचा लाभ देण्यात येईल. या योजनेत तुम्हाला बचत तसेच संरक्षणाची सुविधा एकाच वेळी मिळेल. जर पॉलिसीधारक महिला पॉलिसी मॅच्य़ुअर होईपर्यंत जिवंत असेल तर तिला एकरकमी पैसे मिळतात.
काय आहे नियम
एलआयसी आधार शिला प्लॅननुसार बेसिक सम अश्युअर्ड मिनिमम रक्कम ७५,००० रुपये आणि जास्तीत जास्त ३ लाख रुपये आहे. पॉलिसी टर्म कमीतकमी १० वर्षे आणि जास्तीतजास्त २० वर्षे आहे.
या प्लॅनमध्ये मॅच्य़ुरिटीचे वय हे ७० वर्षे आहे. हा प्लॅन अशा महिलांसाठी आहे ज्या आरोग्यवान आहेत आणि त्यांना कोणतीही मेडिकल टेस्ट करण्याची गरज नाही.
या प्लॅनचा प्रिमियम म्हणजेच हप्ता हा मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक असा भरता येतो. महिलांसाठी खासकरून तयार करण्यात आलेल्या या प्रिमियम, मॅच्युरिटी क्लेम आणि डेथ क्लेमवर कर सवलत देखील मिळते.
जर पॉलिसी घेतल्यानंतर पाच वर्षांनी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर मॅच्युरिटीवर लॉयल्टी अॅडिशनची सुविधा मिळते. अॅक्सिडंट बेनिफिट रायडरदेखील आहे.
मॅच्युरिटीला मिळू शकतात 4 लाख रुपये
जर एखादी महिलेने ३१ वर्षी पॉलिसी घेतली आणि या पॉलिसीचा अवधी २० वर्षांचा असला तर ४.५ टक्के टॅक्ससोबत पहिल्या वर्षाचा प्रिमियम १०,९५९ रुपयांचा असेल. त्यानंतर २.२५ टक्क्यांसह फर्स्ट ईयर प्रिमियमनंतर हा प्रिमियम १०,७२३ रुपयांचा होईल. म्हणजेच रोज २९ रुपयांची बचत करावी लागेल. या पद्धतीने एकूण २,१४,६९६ रुपये जमा करावे लागतील. तुम्ही मासिक, तिमाही आणि सहामाही पद्धतीने प्रिमियम जमा करू शकता. २० वर्षांनंतर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळेस ३ लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळेल.
पॉलिसी रद्द केल्यानंतरसुद्धा सुविधा
आधारशिला पॉलिसीच्या प्रिमियम भरण्यासाठी एलआयसी १५ ते ३० दिवसांचा अतिरिक्त वेळ देते. जर तुम्हाला पॉलिसी रद्द करायची असेल तर त्याचाही पर्याय तुम्हाला दिला जातो. तुम्ही पॉलिसी घेतल्यानंतर १५ दिवसांच्या आत ती रद्द करू शकता.