⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | शेतकरी कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रयत सेनेचे कार्य ; गणेश पवार

शेतकरी कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रयत सेनेचे कार्य ; गणेश पवार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२१ । पावसाचे दिवस असले तरी गेल्या दोन महिन्यांपासून शेतीला पाहिजे तेवढा पुरक पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला असून शेतकऱ्यांना सततच्या नापिकी व नुकसानीमुळे राज्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस, पिकांवरील रोगामुळे उत्पादन खर्चा इतकेही उत्पन्न शेतमालाच्या विक्रीतून न निघणे आणि व्यापाऱ्यांकडून शेतमालाला दर योग्य न मिळणे देखील कठीण असते अशा वेळेस शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय केल्यास कर्जातुन मुक्त होण्यास शेतकऱ्यांना हातभार लागणार असल्याचे सांगत शेतकरी कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रयत सेनेचे कार्य असल्याचे प्रतिपादन  कोदगाव येथे रयत सेना शाखा फलकाच्या उद्घाटन प्रसंगी रयत सेना संस्थापक गणेश पवार यांनी केले.

शाखा उद्घाटन प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. तालुक्यातील कोदगाव येथे रयत सेना शाखा फलकाच्या उद्घाटन रयत सेना संस्थापक गणेशभाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नागद रोड वरील उपबाजारात शेतकऱ्यांच्या काद्याला कवडीमोल भाव व्यापारी देत असल्याचे शेतकऱ्यांनी संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार यांना सांगताच रयत सेनेचे कार्यकर्ते घेऊन नागद रोड वरील बाजार समितीच्या उपबाजाराच्या प्रवेश द्वारासमोर शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन पुकारल्याने व्यापाऱ्यांचे धाबे दणाणल्याने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कादा प्रति क्विंटल ४५० रुपये योग्य दराने भाव देवून कादा खरेदी केल्याने शेतकऱ्यांना न्याय देण्याचे कार्य रयत सेनेने केले.शेतकरी कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रयत सेनेचे कार्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रदेश अध्यक्ष संतोष निकुंभ (संता पहेलवान) व प्रदेश कार्याध्यक्ष सुमितबाबा भोसले, जिल्हाअध्यक्ष संजय कापसे, प्रदेश सचिव प्रमोद वाघ,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड,तालुका उपाध्यक्ष विलास मराठे, दिपक देशमुख, सागर पाटील,भूषण पाटील, ज्ञानेश्वर सोनार,सोमनाथ गवळी,सचिन गायकवाड अदि पदाधिकारी उपस्थित होते.

कोदगाव रयत सेना शाखेच्या अध्यक्षपदी गोपाल पाटील, शाखा उपाध्यक्ष पंकज चौधरी, उपाध्यक्ष मोतीलाल पाटील , सचिव सोमनाथ पवार, विभाग प्रमुख योगेश आमले, कोषाध्यक्ष देविदास पाटील, कार्याध्यक्ष कुलदिप पाटील , सह कार्याध्यक्ष कृष्णा पाटील, सह सचिव राहुल पाटील, संघटक निलेश पाटील, सह संघटक अनिल पाटील, सोशल मीडिया प्रमुख भूषण रवींद्र पाटील, संपर्क प्रमुख राकेश पाटील ,समन्वयक अनिकेत पाटील यांची निवड रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार यांनी जाहीर केली.

प्रदेश अध्यक्ष संतोष निकुंभ (संता पहेलवान) याप्रसंगी बोलताना म्हणाले की रयत सेनेने गरीब व आर्थिक दुर्बल घटकांना नवीन रेशन कार्ड सह संजयगांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचा लाभ वंचित व गोरगरिबांना करून दिला तसेच कोरोना काळात परीस्थिती नसलेल्या कोरोना बाधीत रुग्नाना वैद्यकीय उपाचारासाठी आर्थिक मदत करून कोरोना बाधीत रुग्नाना रुग्णालयात भरती करून अनेक रुग्नाना संकटाच्या काळात मदत केली. गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटनेने वेळोवेळी आवाज उठवला आहे .दहा ते बारा वर्षाच्या मुलाच्या श्वास नलिकेत बोंड अडकले होते मुलाच्या वडीलानी अनेक रुग्णालयात जाऊन उपचार व्हावा यासाठी प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही.

त्यानंतर आदिवासी परिवारातील बांधव संतोष निकुंभ (संता पैलवान ) यांच्याकडे आले आणि त्यांनी तात्काळ देवरे रुग्णालयात जाऊन डॉक्टर देवरे यांना विनंती करून त्या मुलाच्या श्वास नलिकेतील बोंड डॉक्टराना काढण्यास यश आल्याने मुलाचे प्राण वाचले मात्र आदिवासी कुंटुंबाकडे रुग्णालयाचे बिल भरण्यास पैसे नव्हते ते बील देखील रयत सेनेने भरून सामाजिक बांधिलकी जोपासली. ग्रामीण भागात असणाऱ्या ग्रामस्थांच्या मूलभूत समस्येला प्राधान्य देवून समस्या तडीस नेण्याचे काम रयत सेनेच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले,

कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य यशवंत गांगुर्डे,शरद चौधरी, दिपक पाटील, भीकन पाटील, राजेंद्र चौधरी, यशवंत पाटील, प्रवीण पाटील, अरुण पाटील, आप्पासाहेब पाटील, गणेश पाटील, श्रावण पाटील, धनराज पाटील यांच्यासह तरुण बांधवांसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषणराजे पाटील यांनी केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.