जळगाव शहर

खान्देश मील कॉम्प्लेक्सकडून रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता खुला करावा : राष्ट्रवादी काँग्रेस

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२१ । शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपकडून खान्देश कॉम्प्लेक्समधून रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्तांना त्यांनी याबाबत निवेदन दिले आहे.

जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप व नेहरु चौक येथून रेल्वे स्टेशन कडे जाणारा मार्ग “राजमुद्रा” या कथित मालकाने बंद केला असून तो पूर्ववत सुरु करण्यात यावा. कथीत व वादग्रस्त मालकाने मनपाकडून एनए व बांधकाम परवानगी गेल्या चार वर्षापासून मिळवली आहे. एनए व बांधकाम परवानगी मिळाल्याने सदर जागा रस्ता मनपा मालकीच्या ताब्यात आली असल्याने मालकाने रस्ता बंद करणे, तेथे गेट उभारून वॉचमन ठेवणे व रहदारीस मनाई करणे हे नियमबाह्य आहे.

या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून तेथे बसविण्यात आलेले गेट मनपाने काढून टाकून रस्ता रहदारीस मोकळा करावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका डॉ.अश्विनी देशमुख, महानगराध्यक्षा मंगला पाटील, अशोक लाडवंजारी यांनी जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्तांना दिले आहे.

या निवेदनावर दिलीप शेवाळे, एड.विजय पाटील, मिलिंद सोनवणे, देवेंद्र जाधव, सुहास चौधरी, सुनील माळी, ताहेर शेख, आरिफ शेख, जुबेर खाटिक, दत्तात्रय महाजन, हीना पाटील, प्रदीप पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button