⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | शेअर बाजारात सेन्सेक्सचा नवा विक्रम ; पहिल्यांदा ५४ हजाराचा टप्पा पार

शेअर बाजारात सेन्सेक्सचा नवा विक्रम ; पहिल्यांदा ५४ हजाराचा टप्पा पार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२१ । जुलै महिन्यात जीएसटी करात झालेली दमदार वाढ आणि औद्योगिक उत्पादनाने झेप घेतल्यानंतर गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास दुणावला आहे.आज बुधवारी सलग दुसऱ्या सत्रात देशांतर्गत शेअर बाजाराने नवा इतिहास रचला. आज बाजार सुरु होताच झालेल्या चौफेर खरेदीने सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला आणि ५४ हजार अंकाच्या पातळीवर गेला. त्याच वेळी निफ्टी ५० ने (Nifty50) देखील नवा उच्चांक गाठला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने १३० अंकाची झेप घेतली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना १.२४  लाख कोटींचा फायदा झाला आहे.

शेअर बाजारातील तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने आज बुधवारी आपली घोडदौड कायम ठेवली आहे.

या शेअर्समध्ये वाढ
आजच्या क्षेत्रामध्ये बीएसई, एचडीएफसी, टाटा स्टील, इन्फोसिस, डॉ. रेड्डीज, एचडीएफसी बँक, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रीड, एचडीएफसी बँक, एशियन पेंट, बजाज फायनान्स, एम अँड एम, एचसीएल टेक, बजाज ऑटो, इंटसइंड बँक, टीसीएस, एनटीपीसी, बजाज फिनसर्व, एलटी, रिलायन्स, आयटीसी, मारुती, टायटन, अॅक्सिस बँक आणि अल्ट्रा सिमेंटचे समभाग हिरव्या मार्कांनी व्यवहार करत आहेत. त्याचबरोबर भारती एअरटेल, एसबीआय, हिंदुस्तान युनिलिव्हर, सन फार्मा आणि नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये घसरण झालीय. आज एनएसईवर टॉप 5 शेअर्सच्या यादीत अदानी पोर्ट्स, एचडीएफसी, इन्फोसिस, टाटा स्टील आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स आहेत. त्याचबरोबर, नुकसान झालेल्यांमध्ये शेअर्समध्ये भारती एअरटेल, ओएनजीसी, टाटा कन्झ्युमर, एसबीआय लाइफ आणि हिंडाल्कोचे शेअर्स आहेत.

निफ्टीवर सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली आहे. आज एसबीआय, टायटन, गोदरेज कंझुमर प्रॉडक्ट, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. जुलै महिन्यात जीएसटी करात झालेली दमदार वाढ आणि औद्योगिक उत्पादनाने झेप घेतल्यानंतर गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास दुणावला असल्याचे जाणकांचे मत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.