⁠ 
रविवार, मे 19, 2024

भडगाव तहसील कार्यालयात अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेचा ‘या’ तारखेला होणार लिलाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ ऑगस्ट २०२१ । भडगांव तालुक्यात अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करणारे 17 ट्रॅक्टर/ट्रॉली वाहने जप्त करुन तहसिल कार्यालय, भडगांव येथे लावण्यात आले आहेत. या वाहन मालकांना अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक केलेबाबत दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु संबधित वाहनमालक यांनी दंडात्मक रक्कमेचा भरणा अद्याप केलेला नाही.

त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 176 ते 184 मधील तरतुदीनुसार जप्त केलेल्या वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी समजून वरील तरतुदीनुसार जप्त वाहनांचा लिलाव तहसिल कार्यालय, भडगांव व शासकीय विश्रामगृह, भडगांव येथे 13 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता करण्यात येणार आहे. असे सागर ढवळे, तहसिदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, भडगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

लिलावातुन प्राप्त होणारा महसुल शासनास जमा करण्यात येणार आहे. अटाकावुन ठेवलेल्या वाहनाचे उप प्रादेशिक परीवहन अधिकारी, जळगांव यांचेकडुन मुल्यांकन प्राप्त झाले असून या मुल्यांकनानुसार उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा यांचेकडुन लिलाव करणेस मंजुरीही प्राप्त झाली आहे. तरी या वाहन मालकांनी विक्रीकरीता निश्चित केलेल्या तारखेपुर्वी देय रक्कम शासन जमा करावी अन्यथा या वाहनांचा लिलाव करण्यात येईल.

लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या मालमत्तेची हातची किंमत, अनामत रक्कम तसेच लिलावाच्या अटी व शर्ती याकरिता तहसिलदार, भडगांव यांचे कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असेही श्री. ढवळे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.