जळगाव जिल्ह्यात दीड वर्षानंतर रुग्णसंख्या केवळ १
जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ ऑगस्ट २०२१ । जळगाव जिल्ह्यात २८ मार्च २०२० रोजी पहिला रुग्ण सापडला होता. गेल्या दीड वर्षात रुग्णसंख्येने हजारी पार केली. दरम्यान, आज २ ऑगस्ट रोजी आलेला रुग्णांचा आकडा हा प्रचंड दिलासादायक असून आज जिल्ह्यात केवळ १ नवीन रुग्ण आढळून आला आहे. तसेच आज एकही मृत्यू झालेला नाहीय. तर आज ०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.
दरम्यान, आज १५ तालुक्यांपैकी तब्बल १४ तालुके निरंक आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात असताना बहुतांश तालुक्यांमधील सक्रिय रुग्णांची संख्या दहाच्या आत आली आहे. त्यामुळे हे तालुके कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार ६०६ झाली असून, बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ९६२ वर पोचला आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९८.१५ टक्के आहे. जिल्ह्यात आज एकही मृत्यू झालेला नसून एकूण मृताचा आकडा २५७५ वर गेला आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-००, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ -००, अमळनेर -००, चोपडा-०१, पाचोरा-००, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर -००, पारोळा-०, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-००, बोदवड-०० असे एकुण ०१ बाधित रूग्ण आढळले आहे.