जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । भुसावळ शहरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याच्या कारवाईने खळबळ उडाली आहे. त्यात रायफल, बंदुका, तलवारी व चाकूंचा समावेश आहे. दरम्यान, याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.
याबाबत असे की, शहरात बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकांनी पोलीस स्थानकाच्या हद्दीत असणार्या घरांमध्ये छापेमारी केली. या कारवाईत मुस्लीम कॉलनी भागातील ईदगाह समोर राहणारा शेख पप्पू उर्फ शिकारी अब्बास शेख आणि त्याचा मुलगा रिझवान पप्पू शेख यांच्याकडे मोठा शास्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती पोलीस पथकाला मिळाली. याची खातरजमा करून पथकाने छापा मारला असता शेख याच्या घराजवळच्या शेडमध्ये मोठा साठा मिळाला.
यात चार चाकू, चार तलवारी, एक रायफल, दोन बंदूक आदींचा समावेश आहे. पोलीस पथकाने हा साठा जप्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला असून शेख पप्पू उर्फ शिकारी अब्बास शेख आणि त्याचा मुलगा रिझवान पप्पू शेख हे दोन्ही आरोपी फरार झाले आहेत.पुढील तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरिक्षक दिलीप भावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जयेंद्र पगारे हे करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक दिलीप भागवत, सपोनि अनिल मोरे, पोहेकॉ जयराम मोरे, नेव्हील बाटली, रवींद्र बिर्हाडे, कृष्णा देशमुख, समाधान पाटील, प्रशांत सोनार, मीना कोळी, जयेंद्र पगारे यांच्या पथकाने केली.