जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । उत्तर प्रदेश येथील शिया वक्फ बॉर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी पवित्र धर्मग्रंथ कुरानच्या आयात वगळण्यात याव्यात, अशी मागणीची याचिका सर्वोच्च न्यायलयात दाखल केली असून रिजवी यांनी दाखल केलेली याचिका सर्वाच्च न्यायलयाने फेटाळुन लावावी अशी मागणी यावल येथील मुस्लीम युवकांच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान यावल शहर मुस्लीम समाज युवकांनी यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेश राज्यातील शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी त्यांच्या वतीने सर्वाच्च न्यायलयात एक याचिका दाखल केली. या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, मुस्लीम पवित्र धर्मग्रंथामधील २६ आयात वगळण्यात यावी असे बोलुन ईस्लामचे पहिले तिन खलिका यांच्या विरूद्ध अनेक बिनबुडाचे आरोप लावून म्हटले आहे की पवित्र धर्मग्रंथ कुरान हे आंतकवादाची शिकवण देतो, सुरूवातीच्या मुस्लीम खलिका यांनी हा फैलाव केला असल्याचे म्हटले असून, कुराण मुळेच मुस्लीम युवक हे आंतकवादाकडे वळत आहे असे त्यांनी म्हटले आहे.
सदरची वसीम रिजवी यांनी केलेले कुरान बाबतचे वक्तव्य हे सोशल मिडीयाच्या माध्यमातुन सर्वत्र पसरले असुन या प्रकारामुळे देशातील मुस्लीम समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहे . अशा प्रकारे ईस्लाम धर्माबाबत गैरवक्तव्य व अपप्रचार करून धार्मिक भावना निर्माण करून तेढ निर्माण करण्याचा हा वसीम रिजवी यांचा खेळ असून त्यांच्या विरूद्ध भादवी कलम २९५अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.
या निवेदनावर अजहर शेख, कदीर खान नसीर खान, तौसीफ शेख नजमोद्दीन, अल्ताफ शेख समद, पप्पु बिल्डर, जावीद शेख, आसीफ शेख, अनिल जंजाळे, नगरसेवक अस्लम शेख नबी, जहीर खान, आसिफ शेख शरीफ आणी ईमरान पहेलवान यांच्या स्वाक्षरी आहे.