⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | हवामान | राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने काही जिल्ह्यात हाहाकार माजवला होता. पावसाने विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करत आहे. जनजीवन पुन्हा नीट रुळावर येत असतांना हवामान विभागाने पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर सोबतच सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मागील तीन चार दिवसापासून जळगाव जिल्हा येलो झोनमध्ये आहे. दरम्यान, एकीकडे महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी होत असताना उत्तर मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाचा अपेक्षित जोर नाही. 

जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्यात आतापर्यंत १०८.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या शुक्रवारपर्यंत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल.

दरम्यान, महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्यासह जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने IMD दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलैपर्यंतची पावसाची माहिती दिली आहे. यलो अलर्ट Yellow Alert यात पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर सोबतच सहा जिल्ह्यांना देण्यात आला आहे. तर जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी रायगड, रत्नागिरी पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे, त्यामुळे या भागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.