गुन्हेजळगाव शहर

दुकानफोडी करणारे तासात गजाआड, शहर पोलिसांची कामगिरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगांव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । शहरात दुपारी ४ नंतर असलेल्या लॉकडाऊनचा फायदा घेत दुकानफोडी करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे. चोरट्यांनी एका गुन्ह्याची कबुली दिली असून मुद्देमाल काढून दिला आहे.

शहरात दुपारी ४ नंतर निर्बंध लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊन असल्याने वाढलेल्या दुकानफोडीच्या घटना लक्षात घेता चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधिक्षकांनी दिल्या होत्या. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक लिलाधर कानडे यांनी आपल्या डीबी पथकाला याबाबत मार्गदर्शन केले होते. पथक तयार करुन त्यांना शहर पोस्टेचे तेजस मराठे व योगेश इंधाटे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दुकान फोडी करणारे इमस हे फुले मार्केट भागात गुन्हयातील चोरी केलेला माल विक्री करीत आहेत. माहितीची खात्री होताच त्यांनी निरीक्षक कानडे यांना कळविले.  

पो.नि.लिलाधर कानडे यांनी हवालदार विजय निकुंभ, उमेश भांडारकर, अक्रम शेख, भास्कर ठाकरे, किशोर निकुंभ, गणेश पाटील, रतन गिते यांना रवाना केले. पथकाने सापळा रचून निलेश सुरेश वाणी वय-३० रा. कांचन नगर व चेतन दिलीप चौधरी वय-२६ रा.कांचन नगर  यांना पकडले. दोघांची विचारपुस केली असता त्यांनी जळगांव शहर पोस्टेला दाखल असलेल्या भाग-५ गुरन २४७/२०२१ भादंवि कमल ४५४, ४५७, ३८० या गुन्हयातील मुददेमाल काढून दिला आहे. दोघांकडून शहरातील बऱ्याच घरफोडया उघडकिस येण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button