⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचाऱ्यांना विमा पॉलिसी मिळावे

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचाऱ्यांना विमा पॉलिसी मिळावे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२१ । भुसावळ औष्णिक विद्युत केन्द्र, दिपनगर येथे मतदार संघातील काही प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून गेल्या ८ ते १० वर्षापासून कार्यरत आहे. परंतु त्यांना आजपर्यंत प्रामुख्याने कौटुंबिक हेल्थ विमा पॉलिसी लागू करण्यात आलेली नाही. या विमा पॉलिसीसह इतर प्रलंबित समस्या मार्गी लावाव्यात यासाठी कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देऊन साकडे घातले आहे.

महानिर्मिती कंपनी कडून प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी हे सेवेवर कार्यरत असताना दुर्देवाने कोणता अपघात घडल्यास त्यांना जीव गमवावा लागतो किंवा शारीरीक मोठी ईजा होते. या करीता कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थी यांना कौटुंबिक विमा हेल्थ पॉलिसी लागू करणे बाबत तत्काळ उपाययोजना करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे. 

ज्या प्रकारे महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मध्ये 3 तीन वर्षानंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थि यांना स्थानिक पदावर सामावून घेतले जाते. तश्या प्रकारे महानिर्मिती कंपनी मध्ये गेल्या ८ ते १० वर्षापासून जे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे त्यांचे बाबत सेवा जेष्ठते नुसार तंत्रज्ञ 3 या पदावर सेवेत कायम स्वरूपी सामावून घेण्याची प्रतिक्रिया राबविण्यात यावी, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी उमेदवार यांना ३ वर्षांच्या वरती झालेले आहे.

त्यांची सुरू असलेल्या प्रशिक्षणावरती ट्रेड टेस्ट घेउन चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून रुजू करून त्यांना सेवा जेष्ठते नुसार (बँच प्रमाणे ) पुढे तंत्रज्ञ-३ पदाच्या उपलब्धते नुसार टप्याटप्याने बढतीत प्राधान्य देण्यात यावे,  जे प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असतांना महानिर्मिती कंपनीच्या जाचक अटीमुळे वय ४५ पूर्ण झालेले आहे. अश्या प्रकल्पग्रस्तांना महानिर्मिती कंपनीमध्ये चतुर्थ श्रेणी 4, (Class 4) या पदावर सामावून घेण्याची प्रतिक्रिया राबविण्यात यावी. तरी याबाबत वरील समस्यांच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी यांना न्याय मिळावा अशीही मागणी कर्मचारी यांनी निवेदनात केली आहे.

निवेदन देताना प्रकल्पग्रस्त न्याय हक्क समितीचे गणेश कोळी, लक्ष्‍मण कोळी, शशांक भटकर, मनोज वारके, गणेश तायडे, अनिल तायडे, गुंजन वाणी आदी उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.