जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२१ । मागील आठवडाभर नफावसुलीच्या दबावाखाली आलेल्या सोने आणि चांदीने आज सकारात्मक सुरुवात केली आहे. जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच सत्रात दोन्ही सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सोने १०० रुपयांनी तर चांदीमध्ये जवळपास १९० रुपयांची वाढ झाली आहे.
कोरोनाचं संकट, लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूसारखे नियम यामुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्यामुळे लोक पुन्हा एकदा सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा आधार घेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. गेल्यावर्षी कोरोनाकाळात सोन्याच्या किंमतीने ५६ हजार २०० रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सध्या सोने ८ हजाराहून अधिक रुपयांनी स्वस्त आहे.
जळगाव सराफ बाजारात गेल्या महिन्याभरात ७०० रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. तर गेल्या आठवड्याचा विचार करता चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार होत असल्याचं दिसून आलं आहे. १९ जुलैला चांदीच्या दरात ३०० रुपयांची घसरण, २० जुलैला ६०० रुपयांची घसरण, २१ जुलैला ८०० रुपयांची घसरण झाली होती. २२ तारखेला ४०० रुपयांची वाढ तर २३ जुलैला पुन्हा एकदा ४०० रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या भावाने ७० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता.
जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८२७ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८, २७० रुपये इतका आहे.
जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ७२, ४९० रुपये इतका आहे.
देशभरातील मोठ्या शहरातील दर
आज मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६८७० इतका आहे तर २४ कॅरेटचा भाव ४७८७० रुपयांवर कायम आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६८५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५१११० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५०६० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१६० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७२५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९९५० रुपये आहे.जागतिक पातळीवर मात्र सोने दरात किंचित घसरण आहे.