जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२१ । शालकाचा खून करून पसार झालेल्या मेहुण्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कौटुंबिक वादातून मेहुण्याने शालकाच्या डोक्यात कुर्हाडीचे घाव घालत शत्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात शुक्रवारी पहाटे घडली होती.
या घटनेत विशाल वामन ठोसरे (24, भुसावळ रोड, पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ, मुक्ताईनगर) या तरुणाचा मृत्यू झाला. खुनानंतर पसार झालेला आरोपी व नात्याने असलेला मेहुणा विजय चेताराम सावकारे (35, चुंचाळे, ता.यावल) यास मुक्ताईनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री चिंचोल शिवारातील केळी बागेतून अटक केली आहे.
आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.