जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२१ । मागील महिन्याला घसरणीला गेलेले सोने आता पुन्हा वाढीस लागले आहे. मागील दोन तीन दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सोने पुन्हा ४९ हजाराच्या दिशेने जाऊ लागले आहे.
आज शनिवार जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या वाढ झाली आहे. २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत १०० रुपयांनी वाढली. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १०० रुपयांनी वाढला. तर चांदी प्रति किलो ३०० रुपयाने महागली आहे. त्यापूर्वी २४ कॅरेट सोन्याचा भाव २७० रुपयांनी वाढला होता. तर चांदी प्रति किलो ५०० रुपयाने महागली होती.
गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार होत असल्याचं पहायला मिळतंय. सोन्याची किंमत पुन्हा हळूहळू वाढताना दिसत असून तिचा पन्नास हजारांकडे प्रवास सुरु झाला आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास ७ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.येत्या काळात सोन्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
आजचा सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८७५ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,७५० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४६४३ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४६,४३० रुपये आहे.
चांदीचा भाव
आज चांदी ३०० रुपयाने महाग झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७४,७०० रुपये इतका आहे.