⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

नगरविकास मंत्र्यांनी दिला सल्ला; मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२१ । शहरातील विविध विकासकामांसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून ६१ कोटी रुपये दिले ही चांगली बाब आहे. भविष्यात देखील २०-२५ कोटी निधी द्यावा परंतु शहर मनपाचे उत्पन्न कसे वाढविता येईल यासाठी इतर मनपाकडून माहिती घ्यावी असा सल्ला नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी दिला.

शहरातील विकास कामे आणि प्रश्नासंदर्भात शनिवारी ना.शिंदे यांनी मनपात आढावा बैठक घेतली. शहरातील मंत्रालय स्तरावर प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सूची तयार करावी. पालकमंत्री यांनी जळगावातील विकासकामांसाठी डीपीडीसीतून ६१ कोटी दिले ही बाब चांगली असून भविष्यात देखील जास्त नको पण २०-२५ कोटी द्यावे. मंजूर निधीचा विनियोग योग्य प्रकारे करावा. शहरातील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर रखडलेला निधी लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करू. जळगाव मनपाला आपले उत्पन्न कसे वाढविता येईल यासाठी इतर मनपाचा अभ्यास करावा, असा सल्ला देखील शिंदे यांनी दिला.

गाळेधारकांच्या हिताचा आणि मनपाचे हित जोपासले जाईल असा धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत देखील सर्वांशी चर्चा केली जाईल असे आश्वासन नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी दिले.