⁠ 
रविवार, मे 19, 2024

महागाईविरोधात सै.नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे आंदोलन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२१ । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लावल्यामुळे देशभरातील लोक आपापले व्यवसाय कामधंदे बंद ठेवून घरीच थांबलेले होते. सर्वसामान्य लोकांकडील जमापुंजी ही लॉकडाउन काळात संपूर्ण रित्या संपलेली आहे. त्यात जे लोक गरीब मजूर व मध्यम वर्गीय रोज कमावून खाणारे लोकांची जास्त वाईट परिस्थिती झालेली असून त्यांना दोन वेळचे जेवणही मिळणे कठीण झाले आहे.  कधी नव्हे अशी अतिशय भयानक परिस्थिती सध्या उद्भवली असून त्यांना आत्ता सरकारकडून मदतीची अत्यंत गरज व आशा असून केंद्र सरकारने भरीव अशी मदत देशातील नागरिकांना करायला हवी. 

परंतु असे असताना देखील केंद्र सरकारने नागरिकांना अशा बिकट परिस्थितीत मदत करण्याऐवजी पेट्रोल, डिझेल, तेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवून आकाशाला भिडविल्यामुळे महागाई प्रचंड वाढली आहे.  लॉकडाऊनमुळे आधीच काम धंदे बंद असल्यामुळे लोकांचे खिसे रिकामे असताना नागरिकांना आर्थिक सहाय्य करण्याऐवजी महागाई वाढवून सरकारने लोकांच्या जखमेवर मलम लावण्या ऐवजी मीठ  चोळण्याचे काम केले आहे. ही दरवाढ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना.

म्हणून केंद्र सरकारने केलेली दरवाढ त्वरित रद्द  व्हावी व या दरवाढीचा निषेध करण्यासाठी आज शनिवार रोजी सकाळी सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन जळगावतर्फे गॅस सिलेंडर व दुचाकींना पुष्पहार घालून  ”बहोत हुई महंगाई की मार, आपकी बार बस कर यार…” हे आंदोलन करण्यात आले. येऊन याप्रसंगी वापस लो वापस लो दरवाढ वापस लो,  बहोत हुई महंगाई की मार  अबकी बार बस कर यार…, मोदी सरकार हाय हाय,  अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडण्यात आला.  यानंतर महामहीम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी यांच्याद्वारा दरवाढ त्वरित मागे घेण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले.

सय्यद अयाज अली नियाज अली यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी सय्यद अयाज अली नियाज अली, शेख शफी, हाजी शेख सलीम उद्दीन, मोहम्मद खान, इलियास नूरी, नाजीम पेंटर, शेख अबुल जुम्मन, हाशिम कुरेशी, तनवीर अहेमद, शेख नूर मोहम्मद, सलमान शेख इ.  उपस्थित होते.