जळगाव जिल्ह्यातील ‘मधकेंद्र योजने’ अंतर्गत मधुमक्षिकापालन व्यवसाय साहित्याचे वाटपमधुमक्षिकापालन व्यवसाय
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२१ । महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मधकेंद्र योजने अंतर्गत जळगाव जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळ कार्यालयामार्फत मधकेंद्र चालकांना मधुमक्षिकापालन व्यवसाय साहित्याचे वाटप करण्यात आले. जळगाव जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगतीशील मधपाळ (मध केंद्र चालक)म्हणून ढालसिंगी, ता.जामनेर, जि.जळगाव येथील विद्यानंद अहिरे यांची निवड करण्यात आली होती.
राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाकडुन शासकीय योजनेनुसार 50 मधूवसाहती मधूकोठीसह मधयंत्र व व्यवसायातील इतर साहीत्याचे राजेंद्र चव्हाण, जळगाव जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.जळगाव जिल्ह्यातील पहिले मधकेंद्र चालक म्हणून जामनेर तालुक्यातील ढालसिंगी येथील विद्यानंद अहिरे यांची जिल्हाधिकारी जळगाव, यांच्या मार्फत निवड करण्यात आली होती. 50%शासकीय अनूदान तत्वावर मधकेंद्र योजना राज्यात राबविण्यात येत आहे.मधकेंद्र चालक म्हणून निवड करण्यात आलेले विद्यानंद अहिरे हे मागील नऊ वर्षांपासून मधुमक्षिकापालनाचा व्यवसाय करीत असून देशातील विविध राज्यांमध्ये मधमाशी पालन वसाहतीचे स्थलांतर करुन मध व इतर उत्पादने मिळवितात.
विद्यानंद अहिरे हे मधमाशा तज्ञ तथा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मधमाशा वसाहती व साहित्य वाटपा वेळी बाळकृष्ण चौधरी, सहाय्यक जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी,रुपेश पाटील, कनिष्ठ सहायक महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जळगाव चे अधिकारी यावेळी उपस्थित होते.