जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जुलै २०२१ । बाजारपेठ अनलॉक झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांचा अपवादवगळता सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण होत होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून या मौल्यवान धातूंचे भाव पुन्हा वाढीस लागले आहे. मागील गेल्या तीन चार दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. तर चांदी देखील पुन्हा वधारू लागलीय. आज सोने प्रति ग्रम ५० रुपयाची किरकोळ वाढ झाली आहे. तर आज चांदी एक हजार रुपयाने महागली आहे.
ईशान्येतील राज्यांमध्ये कोरोना नव्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने करोनाची दुसरी लाट अद्याप कायम असल्याचे दिसून आले आहे. याचे पडसाद कमॉडिटी बाजारावर उमटले आहेत. मागील तीन सत्रात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याने पुन्हा एकदा ४७ हजारांवर मजल मारली असून चांदीचा भाव ७० हजार रुपयांवर गेला आहे.
आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,७८६ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४७,८६० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४५५८ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४५,५८० रुपये आहे.
चांदीचा भाव
तर चांदीच्या भावात देखील हालचाली दिसून येत आहे. आज चांदी १००० रुपयाने महागली झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७४,९०० रुपये इतका आहे.