जळगाव जिल्हागुन्हे

दुचाकी चोरटा जळगाव पोलिसांच्या जाळ्यात ; २.३२ लाखांच्या ९ मोटारसायकली जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या मोटारसायकली चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा आणि जळगाव शहर पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली आहे. गोलू साहेबराव पाटील (वय ४५, रा. बोसर, ता. जि. बहानपूर, मध्यप्रदेश) असं अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून तब्बल २ लाख ३२ हजार रुपये किमतीच्या ९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४.२० वाजेच्या दरम्यान जळगाव शहरातील काबरीम पेठ येथील गोपाल स्टेशनसमोरील सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेली काळ्या रंगाची बजाज कंपनीची प्लेटिना मोटारसायकल क्रमांक MH-19-EM-2330 चोरीला गेली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि जळगाव शहर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत संशयित आरोपीपर्यंत पोलिस पोहोचले. या कारवाईत गोलू पाटील याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीकडून जळगाव शहर परिसरातून चोरी केलेल्या एकूण ९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत २ लाख ३२ हजार रुपये असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे. या कारवाईमुळे जळगाव शहर पोलिस ठाण्यातील ६ आणि जिल्हापेठ पोलिस ठाण्यातील २, तसेच आणखी एका गुन्ह्यासह एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांच्या या कारवाईत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव शहर पोलिस ठाणे आणि जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रेसनोटमध्ये या कारवाईसाठी संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक, सागर शिंपी, जळगांव शहर पो.स्टे. यांच्या नेतृत्वात पोउपनिरी/ दिपक जगदाळे, सफौ. अतुल वंजारी, पोहेकॉ/प्रविण भालेराव, पोहेकों/मुरलीधर धनगर, पोकॉ/प्रदीप सपकाळे, पोहेकॉ / विजय पाटील, पोहेका / अक्रम शेख, पाहेकॉ/ किशोर पाटील, पोकॉ/ छगन तायडे, पोकॉ/राहुल रगडे, पोकॉ/रविंद्र कापडणे, पोकों/ रिजवान शेख नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव व पोहेकॉ/विरेंद्र शिंदे, पोहेकॉ सतीष पाटील, पोकों/अमोल ठाकुर, पोकों/प्रणय पवार नेमणुक-जळगांव शहर पो.स्टे. तसेच पोकों/कुंदनसिंग बयास, पोकों/मुबारक देशमुख, पोकों/ विकास पवार, पोकों/ हर्षल महाजन (बाजारपेठ पो.स्टे.) तसेच पोकों / गौरव पाटील, पोकों / मिलींद जाधव यांचे पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button