तरसोद-पाळधी बायपासवर पुन्हा भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू

सप्टेंबर 24, 2026 10:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । तरसोद-पाळधी महामार्गावरील बायपासवर पुन्हा एकदा भीषण अपघात घडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आसोदा उड्डाणपुलाजवळ घडलीय

accident jpg webp

युवराज भिका सोनवणे (वय ३४) आणि पवन अनिल चौधरी (वय २९, दोघे रा. बिरोदा, जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) असे मृतांची नावे आहेत. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन व युवराज हे दोघे कामानिमित्त दुचाकीने (क्र. एमपी ६८, झेडडी ९२३२) सुरतकडे निघाले होते. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास तरसोद ते पाळधी बायपासने जात होते. आसोदा उड्डाणपुलाजवळ दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आणि दोघेही रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर दोघांनाही वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांना मृत घोषित केले. याप्रकरणी कुमुद चौधरी यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात वाहनचालकाचा शोध पोलीस घेत आहेत. महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now