जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव खुर्द येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय परिसरात टाळ मृदंगाच्या गजरात आज विठूनामाचा गजर करण्यात आला. यावेळी परिसरातील चिमुकल भक्तीरसात दंग झालेले दिसून आले.

आज परिसरातून भक्तीरसात निघालेल्या या दिंडी सोहळयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.इशांन्वी आशिष भिरूड हि आज रूक्मीणीच्या वेशभुषेत दिसून आली यावेळी तिच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळेस परिसरातील नागरीकांनी देखिल उस्फुर्तपणे या दिंडीत सहभाग नोंदवला. विठूनामाच्या आरतीने समारोप करण्यात आला.










