मुंबई-अमरावती दरम्यान धावणार ‘विशेष ट्रेन’; जळगाव, भुसावळसह विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा!

जून 17, 2026 11:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव, भुसावळकर रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते अमरावती दरम्यान विशेष एकेरी रेल्वे गाडी चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीमुळे नाशिक, खान्देशातील जळगाव, भुसावळ आणि संपूर्ण विदर्भातील प्रवाशांचा प्रवास अत्यंत सुकर होणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

train

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११५५ विशेष एकेरी गाडी दिनांक १८ आणि १९ जून २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून रात्री १२:२० वाजता सुटेल. तर त्याच दिवशी सकाळी ७.२३ वाजता जळगावला तर ८.०५ वाजता भुसावळ रेल्वे स्टेशनला पोहोचेल, यानंतर ही गाडी त्याच दिवशी दुपारी १२:३० वाजता अमरावती येथे पोहोचेल. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ही गाडी मध्यरात्रीच्या सुमारास सोडण्यात येत असल्याने प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे.

ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा या स्थानकांवर थांबेल. त्यामुळे केवळ अमरावतीच नव्हे, तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमधील प्रवाशांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now