कोरोना

म्युकोरमायकोसीसच्या उपचाराला टेंडरचा अडसर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२१ । चिन्मय जगताप । जिल्ह्यात म्युकोरमायकोसीसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शर्थीचे उपचार केले जात आहे. म्युकोरच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेला इंडोस्कोपीक कॅमेरा सिस्टीम सध्या टेंडरच्या फितीत अडकला असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका विश्वसनीय सूत्रांनी सांगितली. टेंडर प्रक्रिया जलदगतीने राबवली जात नाही की टक्केवारीसाठी घोडे अडले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील डॉक्टर्स व कर्मचारी रुग्णांची सेवा करत आहेत. म्युकोरमायकोसिस सारख्या किचकट अशा शस्त्रक्रिया देखील येथील डॉक्टर मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून पूर्ण करत आहे. मात्र इथल्या डॉक्टरांना प्रभावी शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारा महत्वपूर्ण कॅमेरा ३५ लाखांचा असून तो उपलब्ध होत नाही.

कोविडमध्ये सरकारकडे इतर गोष्टींवर खर्च करायला भरपूर पैसे होते मात्र ज्या आजाराचा मृत्यूदर जास्त आहे अशा आजारासाठी सरकार जलदगतीने पैसे सोडत नाही. कॅमेरा मागविण्यासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय आणि पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला मात्र तरीही कॅमेरा अद्याप टेंडर प्रक्रियेत तो अडकला आहे. रुग्णांची परिस्थिती गंभीर होत असतानाही मुदाम गेल्या १ महिन्यापासून टेंडरमध्ये अडकवून ठेवला आहे का? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

तर जिवावरही बेतू शकते..
म्युकरमायकोसिसची साधी शस्त्रक्रिया सुद्धा किचकट असते. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जे रुग्ण आहेत त्यांना ४५% इतकेच म्युकरचे इन्फेक्शन झाले आहे मात्र हाच म्युकोर नाकावाटे सायनसमध्ये गेला आणि डॉक्टरांकडे त्यावेळी हा कॅमेरा नसला तर मात्र त्या रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तो कॅमेरा असणं ही तितकच गरजेचं आहे.

४५ पैकी केवळ ७ रुग्णांवर झाले उपचार
सध्यास्थितीत जळगाव शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ४५ म्युकरचे रुग्ण आहेत ज्यातील केवळ ७ रुग्णांवर आतापर्यंत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जे केवळ आणि केवळ डॉक्टरांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळेच शक्य झाले आहे. मात्र जर जास्तीत जास्त शास्त्रक्रिया करायची असेल तर मात्र याठिकाणी तो कॅमेरा आणणे गरजेचे आहे. असेही यावेळी त्या सूत्राने सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button