शंभर रुपयाची लाच भोवली ; जळगावातील महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

एप्रिल 16, 2026 2:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळांतर्गत मिळणाऱ्या गृह उपयोगी वस्तूंच्या संचासाठी केवायसी (KYC) करण्याच्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. जळगाव शहरात ही कारवाई करण्यात आली.

lach jpg webp

नेमका प्रकार काय?

बांधकाम मजुरांना शासनातर्फे गृह उपयोगी वस्तूंचे संच वाटप केले जातात. हे गृह उपयोगी संच मिळण्यासाठी तक्रारदाराने ९ एप्रिल रोजी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानुसार, १५ रोजी चिंचोली (ता. जि. जळगाव) येथील केंद्रावर संच घेण्यासाठी त्यांना बोलावले होते. तेव्हा आवश्यक ‘केवायसी’ प्रक्रिया करून देण्याच्या मोबदल्यात आसमा परवीन शेख इरफान (वय ३८, रा. शिवाजीनगर) या महिलेने १०० रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे तक्रार नोंदवली. यानुसार, १५ एप्रिल रोजी चिंचोली येथील संच वाटप केंद्रावर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून १०० रुपये स्वीकारताना आसमा शेख यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडले. विशेष म्हणजे, कारवाई दरम्यान आरोपी महिला बसत असलेल्या टेबलाखालील पत्राच्या पेटीत ४१ हजार २५० रुपयांची रोख रक्कम आढळून आली.

ही रक्कम इतर लाभार्थ्यांकडून ‘केवायसी’साठी लाच म्हणून स्वीकारल्याचा संशय असल्याने ती जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now