जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२१ । शहरातील शिव कॉलनी स्टॉपजवळ मंगळवारी चिकन विक्री वरून दोन विक्रेत्यांमध्ये वाद झाल्यानंतर बुधवारी भाजीपाला विक्रेत्यांमध्ये दुकान लावण्यावरून मानराज पार्कजवळ वाद झाला. घटनेत दोघे विक्रेते जखमी झाले असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानराज पार्कजवळ विजय रानु भोगे वय-३० रा.दूध फेडरेशन व आकाश शिवाजीराव गावंडे, सागर गावंडे रा.रामेश्वर कॉलनी यांच्यात सकाळी भाजीपाल्याचे दुकान लावण्यावरून वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याने विक्रेत्यांनी भाजी कापण्याच्या चाकूने एकमेकांवर वार केले. घटनेत विक्रेते जखमी झाले असून याप्रकरणी पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आल्या आहे.