जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव, भुसावळकर रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पनवेल (मुंबई) – अलिपूरद्वार दरम्यान धावणारी अमृत भारत साप्ताहिक एक्स्प्रेसची २३ फेब्रुवारीपासून नियमित सेवा सुरू होणार आहे. विशेष या गाडीला जळगाव आणि भुसावळ स्थानकावर थांबा असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे

अलीकडेच या अमृत भारत एक्स्प्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात उद्घाटन झाले होते. प्रारंभी साप्ताहिक स्वरुपात धावणारी पनवेल (मुंबई) – अलिपूरद्वार अमृत भारत आता नियमित धावणार असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

पनवेल – अलीपूरद्वार – पनवेल अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन क्रमांक ११०३१ दिनांक २३ फेब्रुवारीपासून पनवेल येथून दर सोमवारी ११.५० वाजता सुटेल व त्याच दिवशी सायंकाळी ६.२२ ला जळगावला पोहोचले नंतर भुसावळ येथे सायंकाळी ७ वाजेल पोहोचेल. त्यानंतर ती अलीपूरद्वार येथे तिसऱ्या दिवशी १३.५० वाजता पोहोचेल. तर परतीला ट्रेन क्रमांक ११०३२ दिनांक २६ फेब्रुवारीपासून अलीपूरद्वार येथून दर गुरुवारी ०४.४५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.४५ला भुसावळ येथे तर रात्री ७.२५ ला जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचेल. यानंतर ती पनवेल येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ०५.३० वाजता पोहोचेल.
या स्थानकांवर असेल थांबा?
या गाडीला कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, बरगढ, प्रयागराज छिवकी, मेजा रोड, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलिपुत्र, सोनपूर, हाजीपूर जंक्शन, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, हसनपूर रोड, खगडिया, मानसी, नौगछिया, कटिहार, बरसोई, किशनगंज, अलुआबारी रोड, न्यू जलपाईगुडी, सिलीगुडी, बिन्नागुडी व हासीमारा असे थांबे आहेत.
दरम्यान, या गाडीच्या सुरुवातीमुळे प्रवाशांना दार्जिलिंग, महाबोधी मंदिर, चित्रकूट धाम तसेच इतर वारसा स्थळांपर्यंत प्रवासाचा मार्ग अधिक सोपा आणि सुलभ होईल. गाडीने नाशिक, जळगाव, भुसावळकर आणि अन्य प्रमुख स्टेशनवर थांबणाऱ्या प्रवाशांना आरामदायक आणि जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.







