⁠ 
रविवार, ऑक्टोबर 27, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | Big Breaking : चारचाकीने येत एकाच रात्री तीन मेडीकल फोडण्याचा प्रयत्न

Big Breaking : चारचाकीने येत एकाच रात्री तीन मेडीकल फोडण्याचा प्रयत्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२१ । शहरातील भुरट्या चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. आकाशवाणी चौकात असलेल्या अँपेक्स मेडिकलमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला असून इतर दोन मेडिकल फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चार चोरटे चारचाकीने आले होते आणि त्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही कैद झाले आहे.

शहरात लॉकडाऊन उघडताच चोऱ्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. आकाशवाणी चौकाजवळ असलेल्या अँपेक्स हॉस्पिटलच्या आवारात अँपेक्स मेडिकल आहे. त्याठिकाणी चेतन प्रकाश नेवे हे काम करतात. गुरुवारी पहाटे ते कर्तव्यावर होते. पहाटे ४.३० च्या सुमारास नेवे नैसर्गिक विधीसाठी मेडिकलला कुलूप लावून गेले होते. ४.५० च्या सुमारास ते परत आले असता त्यांना शटरचे कुलूप तुटलेले दिसले त्यांनी लागलीच याबाबत मेडिकल मालकांना कळविले. मालक आल्यानंतर त्यांनी सात वाजता रामानंदनगर पोलिसांसमोर पाहणी केली असता शटर वाकवले होते तर आत मधील डॉवर तोडून त्यातील ७ हजार २०० रुपये रोख रक्कम व एक घड्याळ असा ८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

आकाशवाणी चौक परिसरात असलेल्या विवेकानंद नेत्रालय आणि विनोद हॉस्पिटलचे मेडिकल देखील फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल अंमलदार ललित भदाणे व तपासी अंमलदार सुशील चौधरी हे आहेत.

Medical Theft

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.