जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावसह खान्देशातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांत दोन महिन्यांपासून मक्याची आवक सातत्याने कमी होत आहे. सध्या मक्याला किमान १२०० रुपये तर कमाल १६०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे.

संपूर्ण खान्देशात यंदा सुमारे १ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक मका पिकाची लागवड झाली. अंदाजे ८० हजाराहून अधिक हेक्टरवर मका पेरणी झाली आहे.

नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर पेरणी झालेल्या मक्याची आवक बाजारात येण्यास अद्याप दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.






