पारा १२ अंशावर ! थंडीच्या गारठ्यापासून जळगावकरांना तूर्त दिलासा, आता पुढे काय?

डिसेंबर 27, 2025 9:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या आठवड्यात हुडहुडी सारखी थंडी जाणवत असताना तापमानात वाढ झाल्याने जळगाव शहरासह जिल्ह्यात थंडी काहीशी कमी झाली आहे. गेल्या आठच दिवसांत रात्रीच्या तापमानात ६.६ अंशांची वाढ झाली. शुक्रवारी जळगावचे किमान तापमान १२.६ अंशांवर पोहोचला. त्यामुळे थंडीच्या गारठ्यापासून जळगावकरांना तूर्त दिलासा मिळाला आहे. पुढील सहा दिवस तापमान चढते राहणार असल्याचा अंदाज आहे.

tapman 2

हवामान विभागाच्या मते उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे हवेतील आर्द्रता वाढली आहे. यामुळे रात्रीचे तापमान स्थिर न राहता त्यात वाढ होत आहे. थंडीची तीव्रता दिवसागणिक कमी होते आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील आठवडाभर तापमानाचा आलेख चढता राहणार आहे. रात्रीचा पारा अजून एक ते दोन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढणार?
दरम्यान, हवामान खात्यानं राज्यात वर्षाच्या शेवटी आणि सुरुवातीला गारठा वाढेल, असा अंदाज वर्तविला आहे. उत्तर भारतातील थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील किमान तापमानात घसरण कायम असून नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्याने होणार आहे. ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी पारा घसरताच राहिल. हवामान अभ्यासक अश्रेय शेटटी यांनी सांगितले की, हिमालय किंवा आसपासच्या परिसरात म्हणावी तशी बर्फवृष्टी झालेली नाही. उत्तराखंड किंवा हिमाचलच्या खालील भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून वर्षाच्या शेवटी आणि सुरुवातीला गारठा वाढेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now