धरणगावच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा लिलाबाई चौधरी पालकमंत्र्यांच्या भेटीला

डिसेंबर 23, 2025 12:03 PM

राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासबाबत सविस्तर चर्चा

lilabai chaudhari

जळगाव लाईव्ह न्यूज । नगरपालिका निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात धरणगाव नगरपालिकेत शहर विकास आघाडीच्या नगराध्य पदाच्या उमेदवार लिलाबाई सुरेश चौधरी विजयी झाल्या असून त्यांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना आमंत्रण देण्यात आले.

नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा लिलाबाई सुरेश चौधरी व माजी नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी नगराध्यक्षा पदग्रहण सोहळ्यासाठी पालकमंत्र्यांना अधिकृत आमंत्रण देण्यात आले.

या भेटीत धरणगाव शहरातील पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा तसेच भविष्यातील विकास प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा झाली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहरहितासाठी एकत्र येण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

पालकमंत्र्यांनी नगरपरिषदेच्या विकासात्मक उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. या सदिच्छा भेटीमुळे धरणगावच्या विकासाला नवी दिशा व गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now