जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२५ । आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा दिली आहे.

2024 च्या हिसांचार प्रकरणात शेख हसीना यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. या प्रकरणात तीन न्यायाधीशांच्या न्यायाधिकरणाने शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती गुलाम मुर्तझा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या न्यायाधिकरणाने एकूण ४०० पानांचा सहा भागांमध्ये निकाल दिला.

सन 2024 सालच्या हिंसक आंदोलनामध्ये हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचे आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर ठेवण्यात आले होते. मात्र, शेख हसीना यांच्याकडून हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावण्यात आले आहेत. दरम्यान, या हिंसाचाराच्या घटनेनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचं सरकार स्थापन झालं होतं.










