जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२५ । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) आणि छपरादरम्यान चार विशेष रेल्वेसेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमध्ये प्रवाशांना अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.

गाडी क्र. ०५५८८ गाडी ९ नोव्हेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दुपारी ३.५५ वाजता सुटेल व छपरा येथे तिसऱ्या दिवशी १.४५ वाजता पोहोचेल तर क्र. ०५५८७ गाडी शुक्रवार ७ नोव्हेंबर रोजी छपरा येथून रात्री १०.४५ वाजता सुटली. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी दुपारी १.४० वाजता पोहोचेल.

क्र. ०५५९० ही गाडी सोमवार १० रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दुपारी ३.५५ वाजता सुटेल व छपरा येथे तिसऱ्या दिवशी १.४५ वाजता पोहोचेल तर क्र. ०५५८९ ही गाडी शनिवार ८ रोजी छपरा येथून रात्री १०.४५ वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी १.४० वाजता पोहोचेल.
या स्थानकांवर असेल थांबा
या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई (झाशी), उरई, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, बादशाहनगर, गोमतीनगर, बाराबंकी, गोंडा, बस्ती, गोरखपूर, देवरिया सदर आणि सिवान या ठिकाणी थांबे असतील.








