प्रवाशांनो लक्ष द्या ! जळगावसह भुसावळ मार्गे धावणाऱ्या चार एक्स्प्रेस 11 नोव्हेंबरपासून रद्द

नोव्हेंबर 5, 2025 10:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२५ । दिवाळीनंतर आता परतीच्या मार्गावर असल्यानं रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. त्यासाठी अनेक विशेष गाड्या चालविल्या जात आहे. मात्र यातच तांत्रिक कामांमुळे जळगाव आणि भुसावळ मार्गे चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

train

शालिमार स्टेशनवरील यार्ड रिमॉडेलिंगचे काम ८ ते २४ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या कामाचा परिणाम अनेक गाड्यांवर होणार आहे. याकामासाठी आग्नेय रेल्वेने दहा एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये जळगाव, भुसावळ मार्गे धावणाऱ्या चार रेल्वेंचा समावेश आहे.

या गाड्या रद्द?

गाडी क्र. १८०२९ मुंबई-शालिमार-कुर्ला एक्स्प्रेस ही ११ ते १९ नोव्हेंबर दरम्यान रद्द आहे. १८०३० शालिमार-मुंबई कुर्ला एक्स्प्रेस ही १३ ते २१ नोव्हेंबर दरम्यान तर १२, १३, १९ रोजी तर १२१५१ मुंबई-शालिमार समरसता एक्स्प्रेस १४, १५, २१ नोव्हेंबरला शालिमार- मुंबई समरसता एक्स्प्रेस रद्द आहे. आरक्षण केलेल्या प्रवाशांना पैसे परत मिळतील.

रेल्वे प्रशासनाने सांगितले की काही गाड्या मर्यादित स्थानकांवर चालवल्या जातील. ८, १५ आणि २२ नोव्हेंबर रोजी १८०४९ शालीमार-अहमदाबाद साप्ताहिक एक्सप्रेस फक्त रांचीपर्यंत धावेल. ९, १६ आणि २३ नोव्हेंबर रोजी १८०५० अहमदाबाद-शालीमार साप्ताहिक एक्सप्रेस रांचीच्या पलीकडे जाणार नाही. तर १८ नोव्हेंबर रोजी १२१०१ मुंबई-शालीमार एक्सप्रेस फक्त संत्रागाची स्थानकापर्यंत धावेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now