जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आढावा बैठक पार

नोव्हेंबर 4, 2025 8:19 PM

केळी पीकविमा व निर्यात सुविधा केंद्रांच्या वाढीसाठी चर्चा

Review meeting for banana farmers

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि निर्यात क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज पार पडली.

या बैठकीस राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पणन व राजशिष्टाचार विभागाचे मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.बैठकीत केळी पीकविमा मिळण्यासंबंधी प्रलंबित मुद्द्यांवर तसेच केळी निर्यात सुविधा केंद्रांची क्षमता आणि संख्या वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी रावेरचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे व कृषी अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.जळगाव जिल्हा हा राज्यातील केळी उत्पादनात अग्रस्थानी असून, शेतकऱ्यांच्या विमा दावे निकाली काढणे, निर्यात साखळी अधिक मजबूत करणे आणि जिल्ह्याला केळी निर्यात केंद्र म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर ठोस निर्णय घेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now