शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५ आरोपी तडीपार
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२१ । शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी या दृष्टीने शनीपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाच गुन्हेगारांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर तडीपार करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. जळगाव शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५ गुन्हेगारांना २ वर्षासाठी तडीपार करण्यात येणार आहे. तडीपारचे आदेश काढलेल्यांचे नाव अनिल घुले, निलेश सपकाळे, संदीप उर्फ राधे शिरसाठ, रुपेश सोनार, मुन्ना उर्फ रतीलाल सोनवणे असल्याची माहिती शनीपेठ पोलिसांनी दिली आहे.
शनीपेठ पोलिसांकडून संशयितांना नोटीस बजाविण्याचे काम सुरू असून यावृत्ताला पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांनी दुजोरा दिला आहे.