Amalner : दाम्पत्याच्या दुचाकीसमोर अचानक गाय आली अन्.. महिला जागीच ठार, पती जखमी

ऑक्टोबर 1, 2025 4:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । देवीचे दर्शन घेऊन घराकडे परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीसमोर अचानक गाय आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले झाल्याची घटना अमळनेर ते टाकरखेडा रस्त्यावर घडली. मंगलाबाई मधुकर ठाकरे (वय ५१, रा. गुरुकृपा कॉलनी, अमळनेर) असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती मधुकर नारायण ठाकरे (वय ५५) हे गंभीर जखमी झाले आहेत.

accident jpg webp

नेमकी घटना काय?
सध्या नवरात्रीचे दिवस असलयाने मधुकर ठाकरे हे आपली पत्नी मंगलाबाई यांच्यासोबत (दुचाकी क्र. एमएच १९ डीएन ८५१४) कुऱ्हे येथील सती माता मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते अमळनेरकडे परतत असताना रस्त्यावरील बुलढाणा अर्बन वेअर हाऊसजवळ अचानक त्यांच्या दुचाकीसमोर गाय आडवी आली. या अनपेक्षित घटनेमुळे मधुकर ठाकरे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची दुचाकी थेट गाईवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात दुचाकीवरून खाली पडलेल्या मंगलाबाई ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, मधुकर ठाकरे हे गंभीर जखमी झाले.

अपघात घडल्यानंतर जखमी मधुकर ठाकरे यांना तातडीने खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेची नोंद अमळनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now