मिनी ट्रॅक्टरसाठी बचतगटांना मिळणार ९० टक्के अनुदान

सप्टेंबर 29, 2025 5:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत योजनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी 90% अनुदान देण्याची योजना राबवली जात आहे. या योजने करिता अर्ज करणारे बचतगटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.

mini tractor

बचतगटातील किमान ८०% सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. बचतगटांचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असलेल्या आणि गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, किंवा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बँक खात्यात या योजने अंतर्गत ३ लाख १५ हजार ही रक्कम मिनी टॅक्ट्रर खरेदी केल्यानंतर जमा करण्यात येते. मिनी ट्रॅक्टर खरेदीची कमाल मर्यादा तीन लाख पन्नास हजार इतकी राहील. नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादा रकमेच्या १०% हिस्सा स्वतः भरल्या नंतरच ते 90 टक्के अनुदानास पात्र राहतील.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, मायादेव मंदिर समोर, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन अनिता राठोड, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now